Last Updated: Saturday, November 19, 2011, 10:32
झी २४ तास वेब टीम, मुंबई 
वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये तळपलेल्या महेंद्रसिंग धोनीच्या बॅटची नोंद गिनीज बुकात झाली आहे. वर्ल्ड कपमध्ये धोनीने वापरलेली बॅट ही जगातली मोस्ट एक्सपेन्सिव्ह बॅट ठरली आहे. ७२ लाख रुपयांना या बॅटचा लिलाव झाला होता आर. के ग्लोबल्स या कंपनीने धोनीची बॅट तब्बल ७२ लाखांना विकत घेतली. या कंपनीच्या नव्या प्रोडक्टचा अनावरणासाठी कपिल देव आणि ब्रॅंड अँम्बेसिडर सुरेश रैना यांच्या उपस्थितीत बॅट माध्यमांसमोर आणण्यात आली.
सुरेश रैनानं यावेळी मनमोकळ्या गप्पा मारल्या. रैनाला त्याचा भविष्यात पुढचा प्लान काय असणार या प प्रश्नाला उत्तर देत तो म्हणाला की, 'आता टीममध्ये जवळजवळ सगळ्याच खेळाडूंचे लग्न झाली आहेत. यापुढे मला लवकरच लग्न करायचं आहे'. असं म्हणून रैनाने मात्र अनेक तरूणींना नाराज केले.
तर सध्या गाजत असणाऱ्या विनोद कांबळीच्या मॅचफिक्सिंगवरच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास कपिल देव यांनी नकार दिला. कपिल देव यांना कांबळीच्या वक्तव्यावर छेडले असता ते म्हणाले, 'या प्रकारबद्दल बोलण्यास ही योग्य जागा नव्हे, चांगल्या वातावरणात अशा वाईट गोष्टींचा उच्चार करून वातावरण खराब करायचं नाही.
First Published: Saturday, November 19, 2011, 10:32