मुंबई इंडियंन्सला ११३ रन्सचे लक्ष - Marathi News 24taas.com

मुंबई इंडियंन्सला ११३ रन्सचे लक्ष

www.24taas.com, चेन्नई
 
 
आयपीएल -५ च्या उदघाटनाच्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जने  मुंबई इंडियंन्सला ११३ रन्सचे टार्गेच दिले आहे. मुंबई इंडियंन्सने दोन षटकात ११ धाव केली आहे.
 
 
गत विजेत्या चेन्नई सुपर किंग्जच्या विरोधातील सामन्यात मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणा-या हरभजन सिंगने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईचा संघ १९.५ षटकात ११२ रन्स काढून बाद झाला.  मुंबईच्या मलिंगा, प्रज्ञान ओझा आणि किरॉन पोलार्डने प्रत्येकी २ गडी बाद केले. रैनाने सर्वाधिक ३६ रन्स केल्या. सुरेश रैनाने शानदार फलंदाजी करत २६ चेंडूत एक षटकार आणि दोन चौकारांच्या साहाय्याने ३६ रन्स केल्या.  तो प्रज्ञान ओझाच्या गोलंदाजीवर मलिंगाकडून झेल बाद झाला.
 
 
अंबाती रायुडूने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत, चेन्नईचा सलामीचा फलंदाज फाफ डू प्लेसिसला धावबाद केले. मॉर्कल पोलार्डच्या गोलंदाजीवर ३ रन्स काढून ओझाकडून झेल बाद झाला. ओझाने चेन्नईला दुसरा धक्का दिला. ब्राव्होला त्याने पोलार्डकडून झेल बाद केले. ब्राव्होने १९ रन्स केल्या.
मुरली विजय १० रन्स काढून फ्रँकलिनच्या गोलंदाजीवर झेल बाद झाला.

First Published: Wednesday, April 4, 2012, 23:49


comments powered by Disqus