मुंबई इंडियन्सची विजयी सलामी - Marathi News 24taas.com

मुंबई इंडियन्सची विजयी सलामी

www.24taas.com, चेन्नई 
 
 
मुंबई इंडियन्सने विजयी सलामी दिलीय. आयपीएलच्या पहिल्याच मॅचमध्ये मुंबई इंडियन्सने गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जला ८ विकेट्सने पराभूत केले.
 
 
चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्ससमोर विजयासाठी ११३ रन्सचं आव्हान ठेवल होत. मुंबई इंडियन्सने १७  व्या ओव्हर्समध्येच हे आव्हान पार केल. मुंबईकडून रिचर्ड लेविने तडाखेबंद हाफ सेंच्युरी झळकावली. सचिन तेंडुलकर १६ रन्सवर रिटायर्ड हर्ट झाला. तर जेम्स फ्रँकलिनने नॉट आऊट १८ रन्स केल्या.
 
 
मलिंगा, ओझा आणि किरॉन पोलार्डने प्रत्येकी २  दोन विकेट्स घेतल्या. दरम्यान प्रथम बॅटिंग करणा-या चेन्नईकडून सुरेश रैनाने सर्वाधिक ३६  रन्स केल्या. तर बोलिंजर आणि ब्राव्होला एक-एक विकेट मिळाली. हाफ सेंच्युरी झळकावणा-या रिचर्ड लेवीला मॅन ऑफ द मॅचने गौरवण्यात आले.
 
 
संबंधित बातमी
 
मुंबई इंडियंन्सला ११३ रन्सचे लक्ष

First Published: Wednesday, April 4, 2012, 23:46


comments powered by Disqus