मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न, सचिनला 'भारतरत्न' - Marathi News 24taas.com

मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न, सचिनला 'भारतरत्न'

www.24taas.com, मुंबई
 
१०० सेंच्युरींचा विक्रम गाठणारा सचिन तेंडुलकर आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण या दोघांना भारतरत्न देण्याची मागणी केंद्राकडे करण्यात आली आहे. राज्यसरकारनं या दोघांच्या नावाची भारतरत्न या देशातल्या सर्वोच्च किताबासाठी शिफारस केलीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत ही माहिती दिली.
 
३३ इनिंगच्या प्रदीर्घ संघर्षानंतर सचिनने बांग्लादेश विरूद्ध महाशतक ठोकले होते.. ‘महाशतक’ आजवर कोणीही न गाठलेला एक पल्ला सचिनने गाठला आणि त्यामुळेच सचिनच्या या आगळ्या वेगळ्या विक्रमाबद्दल विधानसभेत अभिनंदनाचा ठराव मांड्ण्यात आला आणि मंजूर देखील झाला.
 
सचिनला भारतरत्न मिळावं, यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं काँग्रेसचे प्रवक्ते आणि बीसीसीआयचे पदादिकारी राजीव शुक्ला यांनीही यापूर्वी सांगितलं होतं.

First Published: Thursday, April 5, 2012, 12:15


comments powered by Disqus