रॉयलची दिल्लीवर २० रन्सने मात - Marathi News 24taas.com

रॉयलची दिल्लीवर २० रन्सने मात

www.24taas.com,बंगळूरू 
 
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दिल्ली डेअरडेविल्सवर २० रन्सने मात केली आहे. प्रथम बॅटिंग करत बंगळुरूने दिल्ली डेअरडेविल्ससमोर विजयासाठी १५८ रन्सचं आव्हान ठेवल होते.
 
 
मात्र दिल्ली ७विकेट्स समोवत१३७ रन्सच करू शकली. बंगळुरूकडून एबी डिविलियर्सने सर्वाधिक नॉट आऊट ६४ रन्स केल्या. तर मॅकडोनाल्डने ३०  रन्स केल्या. याचबरोबर मुथय्या मुरलीधरनने बंगळुरूकडून सर्वाधिक ३  विकेट्स घेतल्या. दरम्यान दिल्लीचा कॅप्टन सेहवाग खातही न उघडता आऊट झाला. एबी डिव्हिलियर्सचे नाबाद अर्धशतक आणि गोलंदाजांनी केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर बंगळूरू रॉयल चॅलेंजर्सने दिल्ली डेअरडेव्हिल्स पराभव करत आयपीएलच्या पाचव्या मोसमाची विजयाने सुरुवात केली.
 
 
एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात दिल्लीचा कर्णधार वीरेंद्र सेहवागने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवीत चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सौरव तिवारी, मोहनीश अग्रवाल आणि डेनिएल व्हिटोरी यांना ठरविक अंतराने बाद करीत बंगळूरू फलंदाजांना जखडून ठेवले. मात्र, एबी डिव्हिलियर्सने एका बाजूने चांगली फलंदाजी करत संघाला दीडशे धावसंख्या गाठून दिली. अखेरच्या षटकांमध्ये विनय कुमारने १८ रन्स केल्या.
 
 
या आव्हानासमोर दिल्लीचे फलंदाज टीकू शकले नाहीत. सुरुवातीपासूनच एकापाठोपाठ एक फलंदाज बाद होत गेल्याने दिल्लीला विजयी धावसंख्या गाठण्यात अपयश आले. कोलकाताविरुद्धच्या सामन्यात विजयी खेळी करणारा इरफान पठाण या सामन्यात अपयशी ठरला. बंगळूरूकडून मुथय्या मुरलीधरन, झहीर खान आणि विनय कुमार यांनी चांगली गोलंदाजी केली.

First Published: Saturday, April 7, 2012, 19:54


comments powered by Disqus