राजस्थान रॉयल्स २२ रनने विजयी - Marathi News 24taas.com

राजस्थान रॉयल्स २२ रनने विजयी

www.24taas.com, जयपूर 
 
राहुल द्रविडच्या राजस्थान रॉयल्सने आयपीलमध्ये आपली विजयी मालिका कायम राखली आहे. त्यांनी गंभीरच्या नाईट रायडर्सला २२ धावांनी हरवून हा सलग दुसरा विजय साकारला आहे.  राजस्थान रॉयल्सच्या १६४ धावांचा पाठलाग करणाऱ्या नाईट रायडर्सचा डाव २० ओव्हर्समध्ये १४२ धावांवर गुंडाळला.
 
टॉस  जिंकून नाईट रायडर्सने राजस्थानला पहिली बॅटींग दिली, मात्र त्यांना राजस्थान रॉयल्सला १६४  रनवर रोखण्यात यश आलं.नाईट रायडर्सकडून मनोज तिवारीने अर्धशतक झळकावून अखेरपर्यंत खिंड लढवली मात्र त्याला अन्य फलंदाजांची साथ लाभली नाही. तिवारीने ५९ धावा केल्या.
 
राजस्थान रॉयल्सने अशोक मनेरिया आणि ब्रॅड हॉज यांच्या फटकेबाजीच्या जोरावर निर्धारित २० ओव्हर्समध्ये ५ बाद १६४ धावा केल्या. कर्णधार द्रविड आणि अजिंक्य रहाणे हे दोन्ही सलामीवीर रनआऊट झाल्याने संघ अडचणीत आला होता.
 
यावर मनेरिया आणि हॉज यांनी डाव सावरून संघाला १५० चा टप्पा पार करून दिला. मनेरियाने ३० बॉलमध्ये ४० धावा केल्या. यामध्ये त्याने ४ चौकार आणि १ सिक्सर ठोकला. तर हॉजने २९ बॉलमध्ये ३ चौकार आणि २ सिक्सर ठोकत ४४ धावा पटकावल्या.
 
 
 

First Published: Sunday, April 8, 2012, 19:54


comments powered by Disqus