पुण्याने केला पंजाब पराभव - Marathi News 24taas.com

पुण्याने केला पंजाब पराभव

www.24taas.com,पुणे
पुण्यातील सुब्रतो रॉय सहारा स्टेडियमवर रंगलेल्या पहिल्या वहिल्या टी-२० सामन्यात रविवारी गांगुलीच्या पुणे वॉरियर्सने पंजाब किंग्जला २२ धावांनी पराभूत केले. पुणे वॉरियर्सने किंग्ज इलेव्हन पंजाबला विजयासाठी १६७ धावांचे आव्हान ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना  पंजाबचा १४४ धावांत खुर्दा झाला. पंजाबकडून बिपुलची नाबाद खेळी व्यर्थ ठरली. सॅम्युअल्स केलेल्या तडाकेबंद ४६ धावांमुळे तो सामनावीर  ठरला.
 
यजमान संघाने सौरव गांगुली (१८ चेंडूंत ३ चौकारांसह २० धावा), मार्लोन सॅम्युअल्स (३९ चेंडूंत २ षटकार, ४ चौकारांसह ४६ धावा), रॉबिन उथप्पा (३३ चेंडूंत २ चौकार, २ षटकारांसह ४० धावा), स्टीवन स्मिथ (१२ चेंडूंत ३ षटकारांसह २५ धावा) यांच्या खेळीच्या बळावर ही धावसंख्या उभी केली. नाणेफेक जिंकून फलंदाजी करणा-या  पुण्याची सुरुवात चांगली झाली नाही. रायडर ८ धावा काढून धावबाद झाला. गांगुलीने २० धावांची खेळी केली. यानंतर सॅम्युअल्स-उथप्पा यांनी चौथ्या विकेटसाठी ८१ धावांची उपयुक्त भागीदारी करून संघाचा डाव सावरला. अखेरीस स्टीवन स्मिथ आणि मनीष पांडे यांनी आक्रमक फलंदाजी करून स्कोअर दीडशेच्या पुढे पोहोचवला.
 
१९ व्या षटकात २७ धावा 
पुणे वॉरियर्सने १९ व्या षटकात २७ धावा वसूल केल्या. तीन चेंडू हरमितसिंगने, तर तीन चेंडू बिपुल शर्मा यांनी टाकले. पहिल्या चेंडूवर एक धाव निघाल्यानंतर दुस-या चेंडूवर हरमितने एक विकेट घेतली. तिसरा चेंडू त्याने नोबॉल टाकला. यावर चौकारासह पाच धावा निघाल्या. पुढचा चेंडूही त्याने नोबॉल टाकला. फलंदाजांनी एक धाव घेतली. उर्वरित चेंडू बिपुलने टाकले. यावर अनुक्रमे ६, ६, १, ६ अशा धावा निघाल्या.
 
संक्षिप्त धावफलक - पुणे वॉरियर्स १६६/६. (सॅम्युअल्स ४६, उथप्पा ४०, स्मिथ २५, ३/२४ हरमित.)वि. वि. पंजाब-१४४/८ (मनदीप २४, नायर २४, बिपुल नाबाद ३५, शर्मा २/३४).

First Published: Monday, April 9, 2012, 09:22


comments powered by Disqus