सचिनचा बोट काळानिळा, खेळणे अनिश्चित! - Marathi News 24taas.com

सचिनचा बोट काळानिळा, खेळणे अनिश्चित!

www.24taas.com,मुंबई
 
आयपीएलच्या पहिल्‍या मॅचमध्ये बोटाच्या दुखापतीने जायबंदी झालेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची जखम अजूनही बरी झालेली नाही.  आज विशाखापट्टणम येथे होणाऱ्या डेक्‍कन चार्जर्स विरूद्धच्‍या सामन्‍यात सचिनच्‍या खेळण्‍याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
 
 
सचिनने आपल्‍या जखमी झालेल्या बोटाची माहिती ट्विटरवरून दिली. तसेच त्याने या बोटाचा फोटोही प्रसिद्ध केला आहे. तो म्हणाला,   'बोटाला झालेली दुखापत अजून पूर्णपणे बरी झालेली नाही. गेल्‍या चार दिवसांमध्‍ये दोन वेळा यातून रक्‍त काढण्‍यात आले आहे', परंतु, अजूनही हा बोट बरा झालेला नाही. असे त्‍याने @sachin_rt  या आपल्या ट्विटरच्या अकांऊटवर ट्विट केले आहे.
 
 
आयपीएलमधील पहिला सामन्यात मुंबई इंडियन्‍सने चेन्नईला पराभूत केले. जलदगती गोलंदाज डग बोलिंजरचा उसळता चेंडू त्‍याच्‍या बोटावर आदळला. त्‍यामुळे त्‍याला तत्‍काळ मैदान सोडावे लागले होते.
 

First Published: Monday, April 9, 2012, 15:42


comments powered by Disqus