घरी पोहचल्याचा खूपच आनंद - युवी - Marathi News 24taas.com

घरी पोहचल्याचा खूपच आनंद - युवी

 www.24taas.com, नवी दिल्ली
 
घरी परतल्यावर सर्वाधिक आनंद होत असून आजारातून झपाट्याने बरा होत असल्याचे सिक्सर किंग्ज आणि जिगरबाज क्रिकेटर युवराज सिंग यांने मायदेशी परतल्यावर सांगितले.
 
 
अमेरिकेतून कॅन्सरवरील उपचार केल्यानंतर लंडनमध्ये आराम केल्यानंतर युवी आज मायदेशी परतला. आज आपल्या गुडगाव येथील घराच्या बाल्कनीत उभा राहून पत्रकारांशी बोलताना त्यांनी या भावना व्यक्त केल्या. यापूर्वी त्याने नवी दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळावर मीडियाशी बातचित केली नाही, मात्र, त्यांचे अभिवादन स्वीकारले.
 
 
तो म्हणाला, मला घरी परतून आज खूपच आनंद होत आहे. मी झपाट्याने बरा होत आहे. आता इतर प्रश्नांचे उत्तरं बुधवारी देणार असल्याचे त्यांने यावेळी सांगितले. मीडियाने युवीवर प्रश्नांची भडीमार केली होती. परंतु, थकलेल्या युवीने कोणत्याही प्रश्नाला उत्तर दिले नाही, सर्व प्रश्नांची उत्तर दोन दिवसांनंतर देणार असल्याचे त्याने सांगितले.
 
 
गेल्या अडीच महिन्यामध्ये माझ्या मुलाने खूप सहन केले. परंतु, तो आज पुन्हा घरी परतल्यावर त्याने पुन्हा एकदा विश्व चषक जिंकून आल्यासारखे वाटत, असल्याचे सांगून युवीच्या आईने घरी पोहचलेल्या युवीचे स्वागत केले.
 

फोटोफिचर 


कॅन्सरची लढाई ‘यशस्वी’, युवराज परतला ‘मायदेशी’

First Published: Monday, April 9, 2012, 16:17


comments powered by Disqus