तुझं स्वागत आहे माझ्या भावा- सचिन - Marathi News 24taas.com

तुझं स्वागत आहे माझ्या भावा- सचिन

www.24taas.com, मुंबई
 
भारतीय  टीममधील सीनियर  खेळाडू सचिन तेंडुलकरने युवराजच्या मायदेशी परतण्यावर आनंद व्यक्त केला आहे. तेंडुलकरने ट्विटरवर  ट्विट केलं आहे की, युवी लवकर बरा हो, कॅन्सरच्या कठीण लढाईनंतर तुझं भारतात स्वागत आहे.
 
अमेरिकेत केमोथेरपीच्या तीन वेगवेगळ्या ट्रीटमेंट नंतर युवराज  आज भारतात परतला. नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याला घेण्यासाठी त्याची आई शबनम ह्या देखील पोहचल्या होत्या. काही दिवस लंडनमध्ये राहिल्यानंतर आज युवराज भारतात परतला.
 
केमोथेरपी दरम्यान आपले केस पूर्णपणे गमावलेला युवी त्याच्या चाहत्यांसमोर  लाल रंगाची स्पोर्ट्स कॅप घालून आला होता. विमानतळाहून बाहेर येताच त्याने त्यांच्या चाहत्यांना आणि पत्रकारांना अभिवादन केलं. सचिन तेंडुलकर नेहमीच युवराजच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहिला आहे. मग त्याच्या खेळ खराब होत असो किंवा कॅन्सर विरोधी लढा असो सचिनची साथ नेहमीच युवीला मिळाली आहे.
 
 
 

First Published: Monday, April 9, 2012, 17:17


comments powered by Disqus