मुंबई इंडियन्सचा शेवटच्या बॉलवर विजय - Marathi News 24taas.com

मुंबई इंडियन्सचा शेवटच्या बॉलवर विजय

www.24taas.com, विशाखापट्टणम 
 
मुंबई इंडियन्स आणि डेक्कन चार्जर्स यांच्यात झालेल्या रंगतदार मॅचमध्ये मुंबई इंडियन्सने दणदणीत विजय मिळवला आहे. ५ विकेटने त्यांनी ही मॅच जिंकली. रोहित शर्माने शेवटच्या बॉलवर सिक्स मारून मुंबईचा विजय साकारला. रोहित  शर्मा हाच खरा मॅचविनर ठरला.
 
त्याने फक्त  ५० बॉलमध्ये ७३ रनची तुफानी खेळी केली. त्याने ५ सिक्स आणि ४ फोर मारले. पण डेक्कन चार्जसनेही चांगली लढत दिली. त्यामुळे मॅच रंगतदार अवस्थेत गेली. मात्र रोहित शर्माला एकहाती विजय मिळवून दिला.
 
याआधी मुनाफ पटेल आणि लसिथ मलिंगाच्या भेदक बॉलिंगमुळे मुंबई इंडियन्सने डेक्कन चार्जर्सला निर्धारित २० ओव्हर्समध्ये १३८ धावांवर रोखलं होतं. चार्जर्सकडून शिखर धवन याने जोरदार फटकेबाजी केली. धवनने २४ बॉलमध्ये २ फोर आणि ४ सिक्स  मारले.
 
धवनला ख्रिश्चन आणि व्हाईटने चांगली साथ दिली. ख्रिश्चनने ३९ रन केल्या, तर व्हाईटने  ३० रन केले. कर्णधार संघकारा फक्त १४ रन करून आऊट झाला.
 
पटेलने ४ ओव्हर्समध्ये २० रन देत ४ विकेट घेतल्या, तर मलिंगानेही ४ ओव्हर्समध्ये २७ रन देऊन ३ विकेट घेतल्या. टॉस जिंकून डेक्कन चार्जर्सचा कर्णधार कुमार संघकाराने प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला होता.
 
 
 
 

First Published: Monday, April 9, 2012, 23:58


comments powered by Disqus