Last Updated: Wednesday, April 11, 2012, 13:57
www.24taas.com, बंगळुरु कोलकाता नाइटर रायडर्सला विजय मिळाला आणि चेहऱ्यावरील मावळेलं हसू पुन्हा टीमचा मालक शाहरूख खानच्या चेहऱ्यावर दिसून आले. गौतम गंभीरची खेळी आणि कधी नव्हती ती लक्ष्मीपती बालाजीची धडकी भरवणारी गोलंदाजी यांच्या जोरावर बंगळुरुवर कोलकाता नाइटर रायडर्सला विजय मिळवता आला.
गौतम गंभीरच्या धडाकेबाज अर्धशतकानंतर वेगवान गोलंदाज लक्ष्मीपती बालाजीने बंगळुरुच्या संघाला तब्बल चार हादरे दिले. त्यामुळेच दोन पराभवांनंतर तिसऱ्या सामन्यात कोलकाताच्या खात्यावर पहिला विजय नोंदवला गेला. कोलकाताचा संघ दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि राजस्थान रॉयल्सकडून हरला होता. मंगळवारी कोलकात्याने बंगळुरूवर ४२ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
कर्णधार गौतम गंभीरने साकारलेल्या ६४ रन्यचच्या धडाकेबाज खेळीच्या बळावर कोलकाता नाइट रायडर्सने बंगळुरुपुढे ८ बाद १६५ रन्स केल्या. त्यानंतर बालाजीने फक्त १८ रन्सवर ४ बळी घेतले. त्याला कॅलिसने दोन बळी घेत छान साथ दिली. त्यामुळे बंगळुरूला ९ बाद १२३ धावाच करता आल्या. बंगळुरूची सुरुवात खराब झाली. बालाजी-कॅलिस जोडीने प्रत्येकी दोन बळी घेत बंगुळुरूची ४ बाद २५ अशी त्रेधातिरपीट उडवली. बंगळुरूला ख्रिस गेलकडून मोठय़ा आशा होत्या. परंतु कॅलिसने गेलला फक्त २ धावांवर तंबूची वाट दाखवली. त्यानंतर विराट कोहलीनेही (६) निराशा केली.
बंगळूरने नाणेफेक जिंकल्यावर कोलकाताला प्रथम फलंदाजीची संधी दिली. गंभीरने कर्णधारपदाला साजेसा खेळ दाखवला. त्यामुळेच कोलकाताला चिन्नास्वामी स्टेडियमवर यंदाच्या हंगामातील सर्वोच्च धावसंख्या साकारता आली. जाहिरातीच्या होर्डिगपाशी शॉर्ट सर्किट झाल्यामुळे हा सामना २० मिनिटे उशिराने सुरू झाला.
First Published: Wednesday, April 11, 2012, 13:57