राजस्थान रॉयल्सविरोधात मुंबई जिंकेल का? - Marathi News 24taas.com

राजस्थान रॉयल्सविरोधात मुंबई जिंकेल का?

www.24taas.com, मुंबई
 
डेक्कन चार्जर्सविरुद्धच्या मॅचमध्ये रंगतदार लढतीत मुंबई इंडियन्सनं बाजी मारली होती. आता त्यांचा मुकाबला राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. राजस्थाननं आपल्या दोन्ही मॅचेस जिंकल्यामुळे त्यांचाहगी आत्मविश्वास दुणावलेला आहे. तर राहुल द्रविड आणि हरभजन सिंग यांच्यामध्येही कॅप्टन्सीचं अनोख युद्ध पाहायला मिळणार आहे.
 
मुंबई इंडियन्सला पुणे वॉरियर्सकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर त्यांनी डेक्कनला पराभूत करत कमबॅक केला आहे. रोहित शर्मानं मॅचविनिंग इनिंग खेळत मुंबईच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली  होती. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या मॅचमध्येही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा टीमला असणार आहे. रोहित चमकला असला तरी, बॅटिंग कॅप्टन हरभजन सिंगसाठी चिंतेचा विषय ठरली आहे. सचिन तेंडुलकरच्या खेळण्याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे. त्याची बोटाची दुखापत अजूनही पूर्णपणे बरी झालेली नाही. तर अंबाती रायडूला अजूनही सूर गवसलेला नाही. रिचर्ड लेव्हीनं पहिल्या मॅचमध्ये धुमशान घातलं.
 
मात्र, गेल्या दोन्ही मॅचेसमध्ये त्याला लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. बॉलिंग ही मुंबईची स्ट्रेंथ आहे. मुनाफ पटेल, लसिथ मलिंगा, कायरन पोलार्ड, हरभजन सिंग आणि प्रज्ञान ओझा हे पाचही बॉलर्स जबरदस्त फॉर्मात आहे. आणि आयपीएलमधील बेस्ट फिल्डिंग साईड म्हणून मुंबईच्या टीमकडे पाहिलं जातं. तर राजस्थानची टीमही तुफान फॉर्मात आहे. पहिल्या दोन मॅचेस त्यांनी जिंकल्या आहेत. अजिंक्य रहाणे मुंबईसाठी धोकादायक ठरणार आहे.  तर कॅप्टन राहुल द्रविडपासूनही भज्जी अँड कंपनीला सावध रहाव लागणार आहे. रॉयल्सची टीम अंडरडॉग्ज असली तरी बड्या टीमला धक्क देण्यासाठी ती नेहमीच आतीर असते. आता, राजस्थानची विजयी मालिका रोखण्यात मुंबईला यश मिळतं का ? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First Published: Wednesday, April 11, 2012, 13:34


comments powered by Disqus