Last Updated: Tuesday, April 17, 2012, 11:23
www.24taas.com, मुंबई सचिन तेंडुलकरच्या अनुपस्थित मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सला शंभरी आकडाही ओलांडता आला नाही. वीरेंद्र सेहवागच्या डेअरडेव्हिपुढे मुंबई इंडियन्स नांगी टाकली. माफक रन्सचे आव्हान दिल्लीने तीने विकेट गमावून पूर्ण केले.
सेहवाग ३२ रन्स काढून बाद झाला. तर माहेला जयवर्धने १७ आणि रॉस टेलर ११ रन्सवर नाबाद राहिले. नव्या बॉलने गोलंदाजी करतांना मुंबईच्या आक्रमक फलंदाजांना रोखणारा डावखुरा फिरकीपटू शाहबाज नदीम सामनावीर ठरला. त्याने ४ षटकांमध्ये १६ धावा देत २विकेट्स घेतल्या.
२० व्या षटकात मुंबईचा डाव ९२ रन्सवर संपुष्टात आला. रोहित शर्मा आणि हरभजन सिंग वगळता एकाही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. मुंबईची ही तिसरी निच्चांकी धावसंख्या ठरली. यापुर्वी पंजाबविरुद्ध सर्वबाद ८७ आणि राजस्थान रॉयल्सपविरुद्ध ८ बाद ९४ रन्स केल्या. मुंबईची ६ बाद ४४ अशी अवस्थां असताना तो फलंदाजीला आला होता. त्यादने फटकेबाजी करुन मुंबईला ८९ धावांपर्यंत मजल मारुन दिली. हरभजनने ५ चौकार आणि एका षटकाराच्या. साह्याने ३३ धावा काढल्याम. मॉर्केलने त्यादला बाद केले. क्लिंट मकाय ८ धावा काढून बाद झाला. उमेश यादवने लॉंग ऑन सीमारेषेजवळ त्या चा अप्रतिम झेल घेतला. इरफानला ही विकेट मिळाली.
रोहित शर्मानंतर दिनेश कार्तिकही आल्यापावली परतला. कार्तिकने ३ रन्केस ल्या. उमेश यादवला पुल मारण्याच्या नादात बाद झाला. पोलार्ड पाठोपाठ रोहित शर्माही बाद झाला. रोहितने २९ रन्स केल्या. आगरकरच्याम चेंडूवर रॉस टेलरने त्यातचा झेल घेतला. आघाडीचे फलंदाज बाद झाल्या नंतर रोहितवरच मुंबईची भिस्तच होती. परंतु, रोहितची विकेट गेल्यानंतर कोणीही फारशी चमक दाखवू लागले नाही.
वीरेंद्र सेहवागने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.दिल्लीकडून मुंबईच्या अजित आगरकरला संधी देण्या्त आली होती.. याशिवाय न्यूझीलंडचा धडाकेबाज फलंदाज रॉस टेलरचाही आज संघात समावेश करण्यादत आला आहे. तर आगरकरसाठी वेणूगोपाल रावला बाहेर ठेवण्यात आले.
First Published: Tuesday, April 17, 2012, 11:23