Last Updated: Saturday, April 21, 2012, 16:56
www.24taas.com, नवी दिल्ली आयपीएलच्या पाचव्य़ा सीझनमध्ये कोण सिक्सर किंग ठरेल याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. य़ुसफू पठाण, महेंद्रसिंग धोनी ,सुरेश रैना, वीरेंद्र सेहवाग ,सचिन तेंडुलकर या बिग हिटर्सकडून मोठ्या आशा होत्या. मात्र, ख्रिस गेल आणि केविन पीटरसननं भारतीय क्रिकेटपटूंमध्ये मागे टाकत सध्या या रेसमध्ये आघाडी घेतली आहे.
आयपीएलमध्ये उत्तुंग सिक्स पाहायला क्रिकेटप्रेमी स्टेडियमध्ये मोठी गर्दी करत असतात. त्याततच बिग हिटर्स क्रिकेटपटूंच्या बॅटिंगची ट्रीट पाहायला मिळणार हा उद्देश त्यांचा असतो. आयपीएलमध्येही मोठ-मोठे सिक्स मारण्याची अनोखी रेस सध्या क्रिकेटपटूंमध्ये रंगली आहे.मात्र भारताच्या या टी-20 टुर्नामेंटमध्ये सिक्सर किंगच्या रेसमध्ये परदेशी क्रिकेटपटूंचाच बोलबाला आत्तापर्यंत दिसून आलाय.. आणि यामध्ये प्रामुख्यानं उल्लेख करावा लागले तो वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल आणि इंग्लंडच्या केविन पीटरसनचा. स्फोटक बॅटिंग आणि उत्तुंग यासाठीच गेल क्रिकेटविश्वात ओळखला जातो. तर पीटरसनची ओळखही काहीशी अशीच आहे. या दोघांनीही आपल्या लौकीकाला साजेसा खेळ करत सिक्सर किंगच्या रेसमध्ये मोठी चुरस निर्माण केली आहे.
क्रिकेटपटू मॅचेस रन्स सिक्सगेल 4 159 15प्लेसिस 6 229 12पीटरसन 3 155 11
बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सच्या ख्रिस गेलनं चार मॅचेसमध्ये 15 सिक्स मारत या रेसमध्ये आघाडी घेतली आहे. तर चेन्नई सुपरकिंग्जचा प्लेसिस या सीझनमध्ये सरप्राईज पॅकेज ठरला आहे. त्यानं 12 सिक्स लगावत दुसरं स्थान पटकावलं आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या केविन पीटरसननं केवळ तीन मॅचेसमध्ये 11 सिक्स लगावत तिस-या स्थानावर झेप घेतली आहे. भारतीय क्रिकेटपटूंनी टुर्नामेंटच्या सुरुवातीलाच क्रिकेटप्रेमींची निराशा केली आहे. वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर, युसूफ पठाण, महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना टीम इंडियाचे हे बिग हिटर्स. या क्रिकेटपटूंकडून उत्तुंग सिक्सची अपेक्षा चाहत्यांना नेहमीच असते. मात्र, आयपीएलच्या पाचव्या सीझनमध्ये हे क्रिकेटपटू सिक्सर किंगच्या रेसमध्ये मागे राहिले आहेत. गेल आणि पीटरसननं या रेसमध्ये आत्तापर्यंत बाजी मारली आहे. मात्र, जसजशी टुर्नामेंट पुढे जाईल तेव्हा सिक्सर किंग्जच्या सिंहासनावर कोण विराजमान होतो. ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
First Published: Saturday, April 21, 2012, 16:56