शेवटच्या बॉलवर चेन्नईचा 'सुपर विजय' - Marathi News 24taas.com

शेवटच्या बॉलवर चेन्नईचा 'सुपर विजय'

www.24taas.com, चेन्नई
 
आयपीएल चेन्नई सुपरकिंग आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या आजची मॅच अत्यंत रोमांचक झाली. मॅच शेवटचा बॉलपर्यंत रंगली होती. महेंद्र सिंग धोनीने शेवटचा बॉलवर २ रन काढून चेन्‍नईच्‍या विजय साकारला. आक्रमक अर्धशतकी भागीदारी केल्‍यानंतर ड्युप्‍लेसिस आणि सुरेश रैना हे एकाच ओव्हरमध्ये झटपट आऊट झाले.
 
ड्युप्‍लेसिस ७३ तर रैना २६ धावांवर आऊट झाला. कुपरने दोघांना एकाच ओव्हरमध्ये आऊट केले. दोघांनी आक्रमक अर्धशतकी भागीदारी केल्‍यामुळे चेन्‍नई सुपर किंग्‍स विजयाच्‍या जवळ पोहोचले. परंतु, दोघेही बाद झाल्‍यानंतर सामना रोमांचक स्थितीत पोहोचला होता. तर त्याआधी राजस्‍थान रॉयल्‍सने चेन्‍नई सुपर किंग्‍सला विजयासाठी १४७ रनचं आव्‍हान ठेवलं होतं.
 
ओव्हेस शहा आणि अशोक मनेरिया यांच्या बॅटींगच्या जोरावर राजस्थानने चेन्नईसमोर विजयासाठी १४७ रनचं आव्हान ठेवलं होतं. टॉस जिंकून राजस्थानचा कॅप्टन राहुल द्रविडने पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला होता. यानंतर द्रविड आणि रहाणेने चांगली सलामी दिली. ओव्हेस शहाने ५२ रन केले, तर मनेरियाने ३६  रन करून त्याला चांगली साथ दिली. राजस्थानने २० ओव्हर्समध्ये ४ विकेट गमावून १४६ धावांपर्यंत मजल मारली होती.
 
 
 
 

First Published: Saturday, April 21, 2012, 19:48


comments powered by Disqus