Last Updated: Tuesday, April 24, 2012, 00:03
www.24taas.com, मुंबई आपला लाडक्या सचिननं आज 40 व्या वर्षात पदार्पण केलंय.. गेल्या 23 वर्षांत सचिननं क्रिकेटमध्ये बॅटिंगच जवळपास सर्व रेकॉर्ड आपल्या नावावर केलेय...मैदान असो मैदानाबाहेर सचिननं आपल्या कामगिरीनं सर्वांचीच मन जिंकलंय.
आपला लाडका सचिन 40 व्या वर्षात पदार्पण केलंय. क्रिकेटचा दैवत गेल्या 23 वर्षांपासून आपल्या भक्तांची इच्छा पूर्ण करतोय.....फोर, सिक्स...सेंच्युरीजनं प्रत्येक वेळी सचिननं चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्यात..त्यानं आपल्या बॅटनं क्रिकेटमधील यशाची सर्व शिखरं पादाक्रांत केलीय..
आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 सेंच्युरींचा विक्रम करणारा सचिन रेकॉर्डसचा बेताज बादशाहचं..( 100 सेंच्युरीचे शॉर्टस..) क्रिकेटच्या मैदानावर सचिन जसा सुपहिट आहे. तसाच मैदानाबाहेरही त्यानं आपली जबाबदारी चोख पार पाडलीय.. सामाजिक कार्यातही तो नेहमीच पुढे राहिलाय..त्याचप्रमाणे एक मुलगा, पती आणि पिता म्हणूनही तो परिपूर्ण ठऱलाय...त्यामुळे मैदान असो वा मैदानाबाहोर सचिन जैसा कोई नही असचं म्हणावं लागेल.
First Published: Tuesday, April 24, 2012, 00:03