सचिन तेंडुलकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!! - Marathi News 24taas.com

सचिन तेंडुलकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!

www.24taas.com, मुंबई
 
सचिन रमेश तेंडुलकर. भारतीय क्रिकेटला पडलेलं एक सुखद स्वप्न. १५ नोव्हेंबर १९८९ला सचिननं पहिली आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅच खेळली. तेव्हापासून  आजतागायत तो भारतीय क्रिकेटची अविरत सेवा करतो आहे. वयाच्या ४० व्या वर्षात पदार्पण केल्यानंतरही सचिनचा उत्साह तरुणांना लाजवणारा आहे. सचिनने आतापर्यंत १८८ टेस्टमध्ये ५५.४४च्या सरासरीने विक्रमी १५ हजार ४७० रन्स केल्या आहेत.
 
यामध्ये त्याने तब्बल ५१ सेंच्युरी आणि ६५ हाफ सेंच्युरी झळकावल्या आहेत. तर ४६३ वन-डेमध्ये त्याने ४४.८३च्या सरासरीने विक्रमी १८ हजार ४२६ रन्स केल्या आहेत. वन-डेमध्ये ४९ सेंच्युरी आणि ९६ हाफ सेंच्युरींचा झळकावण्याचा पराक्रम त्याने केला आहे. सचिनची आतापर्यंतची ही कामगिरी थक्क करणारीच. विक्रमांचा एव्हरेस्ट सर केल्यानंतर सचिनची रन्सची भूक अजूनही संपलेली नाही. हा रनवीर अजूनही प्रत्येक मॅचसाठी नव्या जोमानेच ग्राऊंडवर उतरतो.
 
आपला लाडाक्या सचिननं आज  ४० व्या वर्षात पदार्पण केलं आहे. गेल्या २३ वर्षांत सचिननं क्रिकेटमध्ये बॅटिंगच जवळपास सर्व रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. मैदान असो मैदानाबाहेर सचिननं आपल्या कामगिरीनं सर्वांचीच मन जिंकली आहेत. फोर, सिक्स, सेंच्युरीजनं प्रत्येक वेळी सचिननं चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. त्यानं आपल्या बॅटनं क्रिकेटमधील यशाची सर्व शिखरं पादाक्रांत केली आहेत. आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० सेंच्युरींचा विक्रम करणारा सचिन रेकॉर्डसचा बेताज बादशाहचं. क्रिकेटच्या मैदानावर सचिन जसा सुपरहिट आहे.
 
तसाच मैदानाबाहेरही त्यानं आपली जबाबदारी चोख पार पाडली आहे. सामाजिक कार्यातही तो नेहमीच पुढे राहिला आहे. त्याचप्रमाणे एक  मुलगा, पती आणि पिता म्हणूनही तो परिपूर्ण ठऱला आहे. त्यामुळे  मैदान असो वा मैदानाबाहेर सचिन जैसा कोई नही असचं म्हणावं लागेल. आपल्या कामगिरीनं त्यानं संपूर्ण जग आपलंस केलं आहे. वयाची 39 वर्ष पूर्ण करत असताना  क्रिकेटमधला धृव तारा असाच मैदानावर तळपत राहो अशाच शुभेच्छा!!!
 
 
 
 
 

First Published: Tuesday, April 24, 2012, 07:50


comments powered by Disqus