Last Updated: Thursday, April 26, 2012, 07:44
www.24taas.com, मोहालीमुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सला पराभूत केल्यानंतर आज मोहालीत पंजाबने मुंबईसमोर विजयासाठी १६९ धावांचे लक्ष्य ठेवले.
पंजाबकडून कर्णधार डेव्हिड हसी याने ४० चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकार लगावत ६८ धावा केल्यात. तर दक्षिण आफ्रिकन खेळाडू डेव्हिड मीलर याने १७ चेंडूत १ चौकर आणि ३ षटकार लगावून ३४ धावांची खेळी केली.
पंजाबने आपल्या डावात केवळ तीन गडी गमावले. मुंबईकडून आर. पी. सिंग, क्लेंट मेकाय, जेम्स फ्रँक्लिन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
किंग्ज इलेवन पंजाब संघाने मुंबई इंडियन्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्या साठी मैदानात उतरला.
मोहाली येथील पीसीए स्टेडियमवर पंजाब हा सामना जिंकून विजयाची मालिका कायम ठेवणार आहे. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्स संघ हा सामना जिंकून सचिन तेंडूलकरला जन्मदिवसाची भेट देण्याच्या विचारात आहे.
First Published: Thursday, April 26, 2012, 07:44