Last Updated: Thursday, April 26, 2012, 14:23
www.24taas.com, नवी दिल्ली मा्स्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं १० जनपथवर सोनिया गांधीचीं भेट घेतली आहे. मास्टर-ब्लास्टर सचिन पत्नी अंजलीसह सोनियांच्या भेटीला गेला होता. त्यामुळे या भेटीमध्ये कशावर चर्चा झाली याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यातील लढत शुक्रवारी होणार आहे. त्यानिमित्त सचिन दिल्लीमध्ये आला आहे. सचिनने नुकतेच आपले महाशतक पूर्ण केले होते. त्यानंतर सोनिया गांधी यांनी सचिनचे अभिनंदन करण्यासाठी त्याला आपल्या निवासस्थानी भेटीचे आमंत्रण दिले होते. त्यामुळे सचिनने आज त्यांची भेट घेतली.
यावेळी प्रियांका गांधी-वढेरा या सुद्धा उपस्थित होत्या. या भेटीवेळी सचिनने सोनिया गांधी यांना फिरोजशहा कोटला मैदानावर सामना पाहायला येण्याचे आमंत्रण दिले.
First Published: Thursday, April 26, 2012, 14:23