'काँग्रेसचा डर्टी पिक्चर खासदारकी सचिनला' - Marathi News 24taas.com

'काँग्रेसचा डर्टी पिक्चर खासदारकी सचिनला'

www.24taas.com, मुंबई
 
सचिनची राज्यसभेतली खासदारकी म्हणजे काँग्रेसचा डर्टी पिक्चर असल्याची टीका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी केली आहे. सचिनला किंवा क्रिकेटला राज्यसभेत काय स्कोप असणार आहे, असा सवाल त्यांनी केला आहे.
 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ’कार्टून वॉच’ या व्यंगचित्रकलेला वाहिलेल्या मासिकाकडून जीवनगौरव पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. मुंबईत मातोश्री या निवासस्थानी हा पुरस्कार सोहळा रंगला. ‘कार्टून वॉच’ हे रायपूरमधून प्रसिद्ध होणारं मासिक आहे. याआधी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण, अबिद सुरती, अजित नैनन आणि प्राण यांना गौरवण्यात आलं आहे.
 
सचिनने आपल्या क्षेत्रात काम करत असताना त्य़ाला आपल्या फायद्यासाठी राज्यसभेत ओढंणं हे काँग्रेसचं घाणेरडं राजकारण असल्याचं बाळासाहेबांनी यावेळी म्हटलं आहे.
 
 

First Published: Sunday, April 29, 2012, 17:18


comments powered by Disqus