सचिनला मुंबईसाठी वेळ आहे का? - Marathi News 24taas.com

सचिनला मुंबईसाठी वेळ आहे का?

www.24taas.com, मुंबई
 
सचिनकडे मुंबईसाठी वेळ नसल्याची खंत माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी व्यक्त केलीय. महाराष्ट्र दिनीनिमीत्त मुंबईच्या अठरा माजी महापौरांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.
 
महापौरांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम झाला. सचिनला स्मरण पत्र पाठवलं असून त्याच्याकडून वेळ मिळाल्यावर नागरी सत्कार करणार असल्याचंही महापौर सुनील प्रभू यांनी सांगितलंय. तर माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी सचिनच्या वागण्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
 
महापौर असताना सचिनकडे दोन वेळा वेळ मागूनही ती मिळाली नसल्याचं सांगितलं. तसंच हा महापौरांचा अपमान असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

First Published: Tuesday, May 1, 2012, 13:03


comments powered by Disqus