डेक्कनने दुसरा विजय मिळवला तर... - Marathi News 24taas.com

डेक्कनने दुसरा विजय मिळवला तर...

www.24taas.com, कटक
 
डेक्कन चार्जर्सनी पुणे वॉरियर्सला १३ धावांनी हरवून  आपला दुसरा विजय साकार केला. प्रथम फलंदाजी करताना डेक्कनने निर्धारित २० ओव्हर्समध्ये ४ बाद १८६ धावा केल्या होत्या.
 
पुण्याकडून स्टीव्हन स्मीथने सर्वाधिक नाबाद ४७ धावा केल्या. त्याला कर्णधार गांगुलीने ४५ आणि मायकल क्लार्कने ४१ धावा करून चांगली साथ दिली. मात्र तरीही पुण्याची टीम विजयी लक्ष्य गाठू शकली नाही.
 
आव्हानाचा पाठलाग करताना पुण्याची टीम २० ओव्हर्समध्ये ५ बाद १७३ धावांपर्यंतच मजल मारू शकली. तत्पूर्वी डेक्कनने कर्णधार कुमार संगकारा याच्या दमदार ८२ धावा आणि कॅमरून व्हाईटच्या ७४ धावांच्या जोरावर १८६ धावांपर्यंत मजल मारली.
 
 
 
 
 

First Published: Tuesday, May 1, 2012, 22:37


comments powered by Disqus