मला पैशापेक्षा मैत्री महत्त्वाची वाटते- सचिन - Marathi News 24taas.com

मला पैशापेक्षा मैत्री महत्त्वाची वाटते- सचिन

www.24taas.com, पुणे

पुण्यात एका अनोख्या क्रिकेट संग्रहालयाचं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. पुण्यातल्या सहकारनगरमध्ये साकारण्यात आलेल्या 'ब्लेड्स ऑफ ग्लोरी' या संग्रहालयात क्रिकेटपटूंच्या स्वाक्षऱ्या आणि त्यांनी मैदानावर वापरलेल्या साहित्यांचा संग्रह करण्यात आला आहे. 'मला पैशापेक्षा मैत्री महत्त्वाची वाटते'. असं सचिनने त्याच्या पत्रकार परिषदेत म्हटंल  आहे.
 
'रोहन पाटे याला मी एक संग्रहक म्हणून माझी बॅट दिलेली नाही तर तो एक माझा चांगला मित्र आहे', 'म्हणून माझी पहिल्या मॅचमधली बॅट या संग्रहलायसाठी दिली आहे'. 'याआधी माझ्याकडे अनेकांनी माझ्या बॅटसाठी मागणी केली होती, 'मात्र रोहन चांगला मित्र असल्याने त्याला ही बॅट मी संग्रहसाठी दिली'.  या संग्रहालयात सचिनच्या बॅटसह सर डॉन ब्रॅडमन यांच्या बॅटचंही कलेक्शन आहे. उद्घाटनाप्रसंगी बोलताना सचिनने हे म्युझियम युवा क्रिकेटर्ससाठी प्रेरणादायी ठरेल असं मत व्यक्त केलं.
 
पुण्यात सचिन तेंडुलकरच्या हस्ते एका अनोख्या संग्रहालयाचं उदघाटन केलेलं आहे. क्रिकेटपटूंच्या स्वाक्षऱ्या आणि त्यांनी मैदानावर वापरलेल्या साहित्यांचा संग्रह पुण्यातील क्रिकेट रसिक रोहन पाटे यांनी केला आहे. त्यातून त्यांनी 'ब्लेड्स ऑफ ग्लोरी' हे संग्रहालय साकारलं आहे. सहकारनगरमध्ये हे अनोखं संग्रहालय साकारण्यात आलं आहे. पुण्यात एका अनोख्या क्रिकेट संग्रहालयाचं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.
 
 
 

First Published: Wednesday, May 2, 2012, 13:52


comments powered by Disqus