Last Updated: Wednesday, May 2, 2012, 16:09
www.24taas.com, दुबई जगातल्या सहा शहरांमधील चाहत्यांना आपल्या लाडक्या सचिन तेंडुलकरसोबत संध्याकाळ घालवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. फिडेलिस वर्ल्ड ग्रुपतर्फे पुढील तीन वर्षं ही सेलब्रेशन सिरीज आयोजित करण्यात आली आहे.
या सेलिब्रेशनची सुरूवात फिडेलीस वर्ल्ड ग्रुपचं मुख्यालय असणाऱ्या दुबईपासून होणार आहे. यासंध्याकाळी सचिन आपल्या कारकिर्दीबद्दल आपल्या चाहत्यांशी संवाद साधेल. तसंच आपल्या काही वस्तूंचा लीलावही करणार आहे. यातून मिळणारे पैसे काही सेवाभावी संस्थांना देण्यात येतील. याशिवाय सचिनला विस्डेन इंडियातर्फे आऊटस्डँडिंग अचिव्हमेंट पुरस्कारही देण्यात येणार आहे.
“या समारंभात काही चाहत्यांना आपल्या लाडक्या सचिनबरोबर संवाद साधण्याची तसंच भोजन करण्याची संधी मिळणार आहे. या सिरीजची सुरूवात शनिवार, ९ जून रोजी दुबई येथील ‘इंटरकाँटिनेंटल, दुबई फेस्टिव्हल सिटी’ येथून होणार आहे.” असं फिडेलीस वर्ल्डच्या पत्रकात सांगण्यात आलं आहे.
“UAE मध्ये मी अनेक अविस्मरणिय मालिका खेळलो आहे. जगातल्या सहा शहरांमध्ये होणाऱ्या दौऱ्याच्या निमित्ताने मला माझ्या चाहत्यांना भेटण्याची संधी मिळणार आहे. याबद्दल मी आनंदी आहे”, असं सचिन म्हणाला.
First Published: Wednesday, May 2, 2012, 16:09