पंजाबचा रॉयल चॅलेंजर्सवर विजय - Marathi News 24taas.com

पंजाबचा रॉयल चॅलेंजर्सवर विजय

www.24taas.com, बंगळुरू
पंजाब संघाने 159 धावांचे लक्ष 19.3 षटकात गाठण्यात यश मिळवले.  शानदार बॅटिंगने पंजाबच्या संघाने रॉयल चॅलेंजर्सवर चार विकेटने विजय मिळवला आहे.
आयपीएलमध्ये आज पंजाब इलेवन सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्यात बंगळुरुने पंजाबपुढे १५९ धावांचे आव्हान ठेवले होते. ख्रिस गेल याने  ७१ आणि विराट कोहली  याने४५ धावा काढत १२७ धावांची भागीदारी केली.
 
आजच्या सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरुने २० षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात १५८ धावा केल्या. अब्राइम डिव्हिलर्सने १३ चेंडूत १७ धावा केल्या.
विराट कोहलीकडून यंदाच्या आयपीएलमध्ये अजून एकदाही चमकदार कामगिरी झाली नाही. आजच्या सामन्यातही त्याला विशेष छाप पाडता आली नाही. त्याने आज ४२ बॉल्समध्ये ३ चौकार व दोन षटकारासह ४५ धावा काढल्या.
 

First Published: Wednesday, May 2, 2012, 23:38


comments powered by Disqus