कोलकात्याचा पुण्यावर ७ धावांनी विजय - Marathi News 24taas.com

कोलकात्याचा पुण्यावर ७ धावांनी विजय

www.24taas.com, कोलकाता
 
आयपीएलमध्ये आज ४७व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडरने पुण्याचा पराभव केला.  कोलकाता नाईट रायडर्सने पुणे वॉरियर्स समोर १५१ धावांचे आव्हान उभे केले होते.  त्याचा पाठलाग करतांना पुणे संघाने निर्धारित २० षटकात ८ गडी गमावत १४३ धावा केल्या.  केकेआरच्या गोलंदाजीपुढे पुण्याची बॅटिंग सपशेल ढेपाळली.
 
गांगुली आणि मॅथ्यूजने काही प्रमाणात पुण्याचा डाव वाचवण्याचा प्रयत्न केला. मॅथ्यूजने युसूफ पठाणच्या गोलंदाजीवर सलग तीन सिक्सर्स  मारून विजयाचं स्वप्न दाखवलं.  पण इतर फलंदाजांची योग्य साथ न मिलाल्यामुळे पुण्याला हा सामना गमवावा लागला.
 
त्याआधी कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर कर्णधार गंभीर आणि मॅक्यूलमने चौफेर फटकेबाजी करत १०.२ षटकात १०० धावा केल्या. यात तीन षटकार आणि ९ चौकारांचा समावेश होता.

First Published: Saturday, May 5, 2012, 19:55


comments powered by Disqus