दिल्लीचे कोलकत्यासमोर १५४ आव्हान - Marathi News 24taas.com

दिल्लीचे कोलकत्यासमोर १५४ आव्हान

www.24taas.com, नवी दिल्ली
 
आयपीएलच्या पॉइंट टेबलमध्ये आघाडीच्या स्थानावर असलेल्या दिल्ली आणि कोलकात्यातील सामन्यात पहिल्या डावात दिल्लीने प्रथम फलंदाजी करीत कोलकात्याला १५४ धावांचे आव्हान दिले. अष्टपैलू इरफान पठाण (३६) जयवर्धने (३०) आणि कर्णधार वीरेंद्र सेहवागने ९ चेंडूत तीन चौकार व एक षटकारासह काढलेल्या २३ धावामुळे दिल्लीला १५३ धावांपर्यंत मजल मारता आली.
 
सेहवागने नेहमीप्रमाणे आक्रमक सुरुवात केली पण केवळ ९ चेंडूत तीन चौकार व एक षटकारासह काढलेल्या २३ धावा काढून तो माघारी परतला त्याला कॅलिसने बाद केले. आज संघात प्रथमच डेविड वॉर्नरचा समावेश केला होता. इंग्लडचा केव्हीन पीटरसन इंग्लडच्या राष्ट्रीय संघात सहभागी झाल्यामुळे वॉर्नरला संधी मिळाली. ब्रेट लीने टाकलेले पहिले षटक त्याने निर्धाव खेळून काढले. सेहवागने मात्र संगवानच्या पहिल्या चेंडूपासून हल्ला चढविला होता. त्याने त्याच्या पहिल्या षटकातच १७ धावा वसूल केल्या.
 
त्यानंतर डेविड वॉर्नरही २१ धावावर बाद झाला. या सलामीच्या जोडीला जॅक्स कॅलीसने बाद केले. त्याने सेहवागला पायचीत तर वॉर्नरला यष्टीरक्षक मॅक्युल्लमद्वारे झेलबाद केले. जयवर्धने ३० धावावर धावबाद झाला. त्याला कर्णधार गौतम गंभीरने एका सरळ थ्रोवर बाद केले. त्याने २७ चेंडूत ३ चौकार व १ षटकारासह ३० धावा केल्या. रॉस टेलरने रटाळ खेळ २७ चेंडूत १६ धावा केल्या.
 
 
इरफान पठाणने शेवटच्या षटकात चांगली फलंदाजी करीत दिल्लीला दीडशे धावांचा पल्ला गाठून दिला. पठाणने २२ चेंडूत तीन चौकार व एका षटकारासह ३६ धावा ठोकल्या. सेहवागने पहिल्या चेंडूपासून फटकेबाजी सुरु केली होती. मात्र कोलकात्याने त्याला चौथ्याच षटकात टिपत सामन्यावर पकड मिळवली. सुनील नारायण व जॅक्स कॅलिसने दोन-दोन गडी बाद केले. ब्रेट ली व प्रदीप संगवान यांनी प्रत्येकी एक-एक गडी बाद केला. नारायणने ४ षटकात २० धावा देत दिल्लीच्या वाढत्या धावाला ब्रेक लावला.
 
 

सेहवागकडे ऑरेंज कॅप-


सेहवागने या स्पर्धेत सर्वाधिक धावा काढत ऑरेंज कॅप पटकावली. सेहवागने ११ सामन्यात ४६८ धावा केल्या आहेत.  त्याच्याखालोखाल राजस्थान रॉयलच्या अजिंक्य रहाणेने ११ सामन्यात ४६३ धावा केल्या आहेत.

First Published: Monday, May 7, 2012, 22:12


comments powered by Disqus