सचिनच्या कतृत्वाला सोन्या-चांदीचा मुलामा - Marathi News 24taas.com

सचिनच्या कतृत्वाला सोन्या-चांदीचा मुलामा

www.24taas.com,  पुणे
 
 
क्रिकेटचा बादशहा, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला तब्बल एक वर्ष शतकाची हुलाकावणी. केवळ एका शतकाने होणार होते महाशतक…जगभरातील सर्व क्रिकेट चाहत्यांनी ज्या शतकाची प्रतिक्षा केली होती. अखेर ते सचिनचे महाशतक मिरपूरमधील शेर-ए-बांगला मैदानावर साजरे झाले आणि वर्षभर लांबलेली महाशतकाची प्रतिक्षा संपली. सचिनवर कौतुकाचा वर्षाव सुरूच  आहे. आता पुण्यातील एक संस्था सचिनला १ किलो सोनं आणि ६  किलो चांदीची ट्रॉफी देऊन गौरव करणार आहे.
 
 
महासेंच्युरी केल्याबद्दल सचिनला पुण्याच्या समृद्ध जीवन फाऊंडेशनतर्फे  १ किलो सोनं आणि ६  किलो चांदीची ट्रॉफी देण्यात येणार आहे. या ट्रॉफीची एकूण किंमत ४०  लाख रूपये असून लवकरच ही ट्रॉफी देऊन सचिनचा गौरव करण्यात येणार आहे. सचिनने महाशतक झळकावळ्यानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तुफान बॅटिंग करणारा सचिन खासदार होवून संसदेत गेला.
 
 
या आधी जगभरातील क्रिकेटपटूंच्या सह्या यांनी खेळाच्या मैदानावर वापरलेलं साहित्य इतकच नाही तर त्यांच्या अविस्मरणीय आठवणींची साक्ष देणारं संग्रहालय पुण्यात साकरलं आहे. क्रिकेट रसिक रोहन पाटे यांनी अथक प्रयत्नांतून देशातील अशा प्रकारचं पहिलच संग्रहालय पुण्यात उभारण्यात आलं आहे. ब्ले़ड्स ऑफ ग्लोरी नावाच्या संग्रहालयाचं उद्धाटन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते झाले.  पुण्यातल्या सहकारनगरमध्ये साकारण्यात आलेल्या ‘ब्लेड्स ऑफ ग्लोरी’ या संग्रहालयात क्रिकेटपटूंच्या स्वाक्षऱ्या आणि त्यांनी मैदानावर वापरलेल्या साहित्यांचा संग्रह करण्यात आला आहे. ‘मला पैशापेक्षा मैत्री महत्त्वाची वाटते’, असे यावेळी सचिनने म्हटले  आहे.

First Published: Tuesday, May 8, 2012, 16:15


comments powered by Disqus