वॉटसनची पावरफुल्ल खेळी - Marathi News 24taas.com

वॉटसनची पावरफुल्ल खेळी

www.24taas.com, पुणे
शेन वॉटसनच्या धडाकेबाज ९० धावांच्या जोरावर राजस्थान रॉयलने पुणे वॉरियर्सचा ७ गडी आणि २२ चेंडू राखून दणदणीत पराभव केला. वॉटसनने ९० धावा करण्यासाठी केवळ ५१ चेंडूंचा सामना केला. राजस्थान रॉयल्सच्या या विजयामुळे आता अंतीम चार संघात पोहचण्याची चढाओढ खूपच रोमांचक वळणावर पोहचली आहे.
 
पुण्याच्या १२६ धावांचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली.  सलामीवीर अजिंक्य रहाणे शून्यावर बाद झाला. त्याला भुवनेश्वरने बाद केले. त्यानंतर कर्णधार राहुल द्रविड (१४) आणि  शेन वॉटसन यांनी संघाचे अर्धशतक फलकावर लावले. मात्र त्याचवेळी द्रविड प्रार्नेलच्या गोलंदाजीवर सोपा झेल देऊन बाद झाला. त्यांच्या जागेवर खेळायला आलेला अशोक मनेरिया १८ धावांवर बाद झाला.
 
 
तरीही एका बाजूने शेन वॅटसनने डाव सांभाळत फटकेबाजी करीत होता. त्याने सर्वप्रथम २७ चेंडूत अर्धशतक ठोकले. त्यानंतरही त्याच्या धावांचा वेग कायम राहिला. अखेर त्याने ओवेश शहाने साथीने संघाला विजयी केले. १२६ धावापैकी एकट्या वॅटसनेने ९० धावा काढल्या. त्याने केवळ ५१ चेंडूत १० चौकार व ४ षटकारासह नाबाद ९० धावांची खेळी केली. त्याच्या खेळीमुळे राजस्थानने विजयी लक्ष्य केवळ १६.२ षटकातच पार केले.
 
 
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या पुण्याने राजस्थान रॉयलपुढे केवळ १२६ धावांचे माफक आव्हान ठेवले आहे. पुण्याने निर्धारित २० षटकात ६ बाद १२५ धावापर्यंतच मजल मारली. पुण्याकडून यंदाच्या मोसमात प्रथमच खेळवलेल्या अमोल मुझुमदारने आज सर्वाधिक ३० धावा केल्या. सलामीवीर सौरव गांगुली (१४) व मायकल क्लार्क (१६) लवकर बाद झाल्यानंतर पुण्याची सुरु झालेली वाताहत शेवटपर्यंत राहिली. अमोल मुझुमदार वगळता एकाही फलंदाजाने चमकदार कामगिरी केली नाही.

First Published: Tuesday, May 8, 2012, 20:21


comments powered by Disqus