'एबी'ची आयपीएलमध्ये धडाकेबाज 'छबी' - Marathi News 24taas.com

'एबी'ची आयपीएलमध्ये धडाकेबाज 'छबी'

www.24taas.com, वृषाली देशपांडे, मुंबई
 
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा डिव्हिलियर्स मॅचविनर ठरतो आहे. या सीझनमध्ये प्रतिस्पर्धी टीम्ससाठी तो चांगलाच डोकेदुखी ठरतो आहे. आपल्या स्फोटक इनिंगनं त्यानं डेक्कनला डिस्चार्ज केलं होतं. त्यामुळे मुंबई इंडियन्ससाठी तो चांगलाच धोकादायक ठरणार आहे. डेक्कन चार्जर्सविरुद्ध                                   डिव्हिलियर्सनी अशक्यप्राय वाटणारा विजय रॉयल चॅलेंजर्सला मिळवून दिला.
 
त्याच्या स्फोटक बॅटिंगपुढे डेक्कनच्या बॉलर्सनी अक्षरक्ष: लोटांगण घातलं. आता, मुंबई इंडियन्सच्या बॉलर्सवर हल्ला चढवण्यासाठी तो सज्ज झाला आहे क्रिकेटमधील प्रत्येक शॉर्ट त्याच्या भात्यात आहे. कुठल्याही क्षणी मॅचचं पारडं तो आपल्या टीमच्या बाजूनं झुकवू शकतो. त्यामुळे मुंबईला त्याच्यापासून सावध रहावं लागणार. डिव्हिलियर्सनं आत्तापर्यंत खेळलेल्या ११ मॅचेसमध्ये ४८.६६ च्या सरासरीनं  २९२ रन्स केले आहेत. नॉटआऊट ६४ रन्स ही त्याची सर्वोत्तम इनिंग ठरली आहे.
 
रॉयल चॅलेंजर्ससाठी तो खऱ्या अर्थानं मॅचविनर ठरतो आहे. डिव्हिलियर्सचा धडका पाहता तो सध्या क्रिकेटविश्वातील सर्वात धोकादाय़क बॅट्समन आहे. मोक्याच्या क्षणी त्याची बॅट नेहमीच क्लिक होते. त्यामुळे मुंबईच्या बॉलर्सना त्याला रोखण्याचं मोठं आव्हान असणार आहे. कुठल्याही चक्रव्य़ुहाला भेदण्याची क्षमता डिव्हिलियर्समध्ये आहे. त्यामुळं त्याला रोखण्यासाठी भज्जी ऍन्ड कंपनीला खास रणनिती आखावी लागणार .
 
 

First Published: Wednesday, May 9, 2012, 17:46


comments powered by Disqus