Last Updated: Tuesday, November 29, 2011, 11:51
झी 24 तास वेब टीम, कटकस्फोटक असा ब्राव्होला आऊट करण्यात यश आलं आहे. त्याने 60 रन्स करत वेस्टइंडिजला चांगला स्कोअर उभारण्यास मदत केली. भारताचा पार्टटाईम बॉलर याने सुरेश रैनाने
ब्राव्होला बोल्ड करून त्याची विकेट मिळवली. वेस्ट इंडिजने 32 ओव्हर मध्ये 148 रन्सची मजल मारली. ब्राव्होचा सोबतीला पोलार्ड आला आहे. त्यामुळे इंडियन बॉलरना या दोघांना झटपट बाद करण्याचा प्रयत्न असणार.
त्यानंतर मात्र ब्रोव्हो आणि हायात यांनी जास्त पडझड होऊ न देता एकेरी दुहेरी धावांवर भर देत चांगली पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी रविंद्र जडेजा आणि आर. अश्विन यांचा समर्थपणे सामना केला. तर हायात 31 रन्सवर असताना विनय कुमारने त्याला रनआऊट केले. तर एकीकडे ब्राव्होने 60 बॉलमध्ये शानदार अर्धशतक पूर्ण केलं.
कटक येथे सुरू झालेल्या भारत विरूद्ध वेस्ट इंडिज वन-डेमध्ये भारताने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. धोनीच्या अनुपस्थितीत टीम इंडियाचं नेतृत्व करणाऱ्या वीरेंद्र सेहवागचा बॉलिंगचा निर्णय विनय कुमारने योग्य ठरवत,पाचव्या ओव्हरमध्ये आंद्रे बराथला आऊट करत विंडिजला पहिला धक्का दिला. तर वरूण ऍरॉनने मार्लन सॅम्युअल्सला 10 रन्सवर बोल्ड करत विंडिजला 46 रन्सवर दुसरा धक्का दिला. त्यानंतर उमेश यादवनं लिंडे सिमॉन्सला आऊट करत भारताला तिसरं यश मिळवून दिलं.
First Published: Tuesday, November 29, 2011, 11:51