Last Updated: Thursday, May 10, 2012, 00:16
www.24taas.com, मुंबई सलामीवीर ख्रिस गेलच्या तडाखेबाज नाबाद ८२ धावांच्या जोरावर रॉयल चॅलेजर्स बंगळुरुने मुंबईचा ९ गडी व १२ चेंडू राखून पराभव केला. सेमीफायनलमध्ये पोहचण्याच्या आशा कायम ठेवल्या. यंदाच्या मोसमातील अतिशय महत्त्वाची व प्लेऑफची दिशा ठरविणा-या सामन्यात मुंबईने १४२ धावांचे माफक आव्हान दिले होते.
त्याला प्रत्त्युत्तर देताना बंगळुरुने सुवातीला सावध खेळ करीत गेल व दिलशाने ८ षटकात ४८ धावांची सलामी दिली. मात्र त्यानंतर दिलशान १९ धावांवर ओझाच्या गोलंदाजीवर पायचित झाला. मात्र त्यानंतर गेलने डावाची सुत्रे आपल्या घेत चौकार व षटकारांचा पाऊस पुन्हा एकदा पाडला. त्याला कर्णधार विराट कोहलीने उत्तम साथ दिली. कोहलीने २५ चेंडूत दोन षटकार व एका चौकारासह नाबाद ३६ धावा केल्या. त्यामुळे बंगळुरुने १८ षटकात १ गड्याच्या मोबदल्यात १४२ धावा करीत महत्त्वपूर्ण सामना खिशात घातला.
आजच्या सामन्यात मुंबईने अतिशय खराब सुरुवात केली असून त्यांनी दुस-याच षटकात दोन फलंदाज गमावले आहेत. जेम्स फ्रॅकलिनने १ आणि रोहित शर्माने तर ० धावा केल्या होत्या. फ्रॅकलिनला त्याने झहीर खानकडे झेल देण्यास भाग पा़डले. तर रोहित शर्माला त्याने पायचित पकडले. बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
First Published: Thursday, May 10, 2012, 00:16