Last Updated: Thursday, May 10, 2012, 14:43
www.24taas.com,न्यूयॉर्क मी माझ्या मुलावर कोणतीही गोष्ट लादणार नाही. त्याला भविष्यात जे काही करायचे आहे, त्याचा निर्णय तो घेईल, असे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने अनेकवेळा सांगितले तरी अर्जुनचे क्रिकेटवर प्रेम असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सचिनचा मुलगा क्रिकेटमध्ये पदापर्ण करण्याचे संकेत मिळाले आहेत.
११ वर्षीय अर्जुन क्रिकेट धडे आपले वडिल सचिन यांच्याकडूनच घेत आहे, हे विशेष. सुरूवातीपासून अर्जुनला क्रिकेटची आवड आहे. तो त्यात रमला आहे. मात्र, त्यांने कोणता गेम खेळावा, हा त्याचा सर्वस्वी निर्णय आहे. तसे त्याला स्वातंत्र आहे. त्यांने त्याच्या आवडीचे क्षेत्र निवडावे, हीच अपेक्षा आहे, असे सचिनने 'टाइम्स' मॅगझीनला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
अर्जुनचे क्रिकेटवर प्रेम असल्याने तो आता तरी अभ्यासाबरोबर क्रिकेटवर भर देत आहे. त्याच्याशी माझा तालमेळ बसतो. खुल्यावातारणात खेळाचा सराव होतो. तो खेळामध्ये खूश आहे. मात्र, माझे दुर्दैव की मी मुंबईत खुलेआम सुट्टी एजॉय करू शकत नाही आणि ते शक्य होणार नाही. त्यामुळे मी नेहमी मुंबई बाहेर जातो. मात्र, माझ्या वडिलांना जी मला शिकवण दिली आहे, त्याचप्रमाणे मी माझ्या मुलांच्याबाबतीत करणार नाही. त्यांना त्यांच्या आवडीचे क्षेत्र निवडण्याची मुभा असेल, असे सचिन सांगतो.
First Published: Thursday, May 10, 2012, 14:43