Last Updated: Thursday, May 10, 2012, 22:03
www.24taas.com, हैदराबादनाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेऊन दिल्लीपुढे १८८ धावांचे जबरदस्त आव्हान ठेवणाऱ्या डेक्कनला वॉर्नर नावाच्या तुफानेने उद्धवस्त केले. डेविड वॉर्नरने ठोकलेल्या घणाघाती नाबाद शतकामुळे दिल्लीने डेक्कनवर ९ गडी व तब्बल २० चेंडू राखून जबरदस्त विजय मिळवला.
डेविड वॉर्नर नाबाद १०९ धावा व नमन ओझा नाबाद ६२ धावा यांच्यामुळे दिल्लीने १८८ धावांचे आव्हान १६.४ षटकातच पूर्ण केले. तसेच या दोघांनी दुस-या विकेटसाठी सर्वोच्च अशी १८९ धावांची अखंडित भागीदारी केली.
वॉर्नरने ५४ चेंडूत ७ षटकार व १० चौकार मारत नाबाद १०९ धावांची खेळी साकारली. तर नमन ओझाने ४६ चेंडूत ५ षटकार व २ चौकारासह नाबाद ६४ धावा ठोकल्या. या विजयामुळे दिल्ली पुन्हा टॉपवर पोहचली आहे.
१८८ धावांचा पाठलाग करताना दिल्लीची खराब सुरुवात झाली होती. कर्णधार वीरेंद्र सेहवाग पहिल्याच षटकातील दुस-या चेंडूवर केवळ चार धावावर बाद झाला. त्याला शिखर धवनने आपल्या फिरकीच्या जाळ्यात ओढत कॅमेरुन व्हॉईटकडे झेल देण्यास भाग पाडले होते. मात्र त्यानंतर डेक्कनच्या एका गोलंदाजाला आपला प्रभाव पाडता आला नाही.
First Published: Thursday, May 10, 2012, 22:03