टीम इंडिया अटीतटीच्या लढतीत विजयी - Marathi News 24taas.com

टीम इंडिया अटीतटीच्या लढतीत विजयी

झी २४ तास वेब टीम, कटक
 
भारताने वेस्ट इंडिजवर पहिल्या वनडेत विजय मिळवला. भारताने अटीतटीच्या लढतीत एक गडी राखून विजय मिळवला. भारताने वनडे सिरीजमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे. मुंबईकर रोहित शर्मा भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला त्याने ७२ रन्सची दमदार खेळी केली. भारताची पडझड होत असताना रोहित शर्माने खेळपट्टीवर ठाम उभा राहत विजय खेचून आणला. जाडेजाने ३८ तर सेहवागने २० रन्स आणि विनयकुमारने १८ रन्स काढल्या.
 
भारताने टॉस जिंकत प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर २११ धावांचे आव्हान उभं केलं.वेस्ट इंडिजच्या ब्राव्होने ६० रन्स फटकावल्या.  विनयकुमार, आश्विन. जाडेजा आणि रैनाने प्रत्येकी एक विकेट घेतली. उमेश, एरॉनने प्रत्येक दोन विकेटस घेतल्या.
 
 

First Published: Tuesday, November 29, 2011, 17:24


comments powered by Disqus