Last Updated: Saturday, May 12, 2012, 23:12
www.24taas.com, चेन्नई चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली डेअरडेव्हील्सवर 9 गडी राखून विजय मिळविला. मुरली विजय 48 तर सुरेश रैना 28 धावांवर नाबाद राहिले. चेन्नईसमोर 115 धावांचे आव्हान होते. मात्र मायकल हसी आणि मुरली विजय यांनी हे आव्हान लीलया पेलले.हसी आणि मुरली यांनी 75 धावांची दमदार सलामी दिली. टिकून राहिलेली ही जोडी इरफान पठाणने फोडली. हसी 38 धावांवर बाद झाला.
चेन्नईने आज नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निरणय घेतला होता. दिल्लीने चेन्नई सुपर किंग्सला 115 धावांचे आव्हान दिले. पण विरूच्त्या संघाने फारशी बहरदार कामगिरी केली नाही. वेणूगोपाल राव आणि योगेश नागर यांनी 48 धावांची भागीदारी करुन डाव सावरला. परंतु, अश्विनने रावला बाद केले. राव 26 धावा काढून बाद झाला.योगेश नागरने एक बाजू लावून धरत 43 धावा काढल्या.
पहिल्याच ओव्हरमध्ये कॅप्टन विरेंद्र सेहवागचा त्रिफळा उडला. हिल्फेनहॉसच्या अप्रतिम आऊटस्विंगरवर सेहवाग फसला. सेहवाग फक्त 4 धावा काढून बाद झाला. तर वॉर्नरने 8 धावा काढल्या. त्यानंतर हिल्फेनहॉसने नमन ओझाला बाद केले. तर मॉर्केलने जयवर्धेनेला 8 धावांवर बाद केले.
First Published: Saturday, May 12, 2012, 23:12