पाकिस्तानी क्रिकेट टीम भारतात येणार... - Marathi News 24taas.com

पाकिस्तानी क्रिकेट टीम भारतात येणार...

www.24taas.com, मुंबई
 
विस्कटलेले राजनैतिक संबंध आणि राजकीय विरोध यामुळे हद्दपार झालेलं भारत-पाकिस्तान क्रिकेट आता पुन्हा रंगण्याची चिन्ह आहेत. ऑक्टोबरमध्ये भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बीसीसीआयनं पाकिस्तान संघाला आमंत्रण दिलं आहे.
 
शनिवारी चेन्नईत झालेल्या बीसीसीआय कार्यकारी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे चॅमियन्स लीगमध्ये प्रथमच खेळण्याचा पाकिस्तान टीमचा मार्ग मोकळा झाला आहे.
 
अर्थात कार्यकारी समितीनं घेतलेल्या या निर्णयावर चॅम्पियन्स लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलचं शिक्कामोर्तब होणं बाकी आहे. तसेच बीसीसीआयनं घेतलेला निर्णय हा चॅम्पियन लीगपुरताच मर्यादित असल्याचं बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे.
 
 
 

First Published: Sunday, May 13, 2012, 11:39


comments powered by Disqus