Last Updated: Tuesday, September 10, 2013, 19:13
www.24taas.com झी मीडिया, मुंबईभारतीय टीमचा खेळाडू गौतम गंभीर आता लवकरच इंग्लिश काऊंटींगच्या सत्रात खेळतांना दिसणार आहे. आता गौतम गंभीर पुन्हा आपल्या क्रिकेट टीमसोबत खेळतांना दिसेल. तो काही कारणांमुळं पुन्हा भारतात परतलाय.
गौतम गंभीर भारतीय टीममध्ये येण्यासाठी खूप कसून सराव करत होता. मात्र तो १ सप्टेंबर या दिवशी भारतात परतला आहे. क्लबच्या वेबसाईटनुसार असं सांगण्यात आलंय की, गौतम हा कॅटरबरीमध्ये दिसणार आहे.
जिथं बुधवारपासून एसेक्सची टीम केंटसोबत चॅम्पियनशिप मॅच खेळणार आहे. गौतम हा १ सप्टेंबरला भारतात आला असला तरी तो बुधवारी होणाऱ्या मॅचच्या अगोदर या टीमसोबत असेल, अशी घोषणा एसेक्स कांऊटींग क्रिकेट क्लबनं केली आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, September 10, 2013, 19:13