तिलकरत्ने दिलशान कसोटी क्रिकेटमधून निवृत्त,Tilkaratane Dilshan Retires From Test Cricket

तिलकरत्ने दिलशान कसोटी क्रिकेटमधून निवृत्त

तिलकरत्ने दिलशान कसोटी क्रिकेटमधून निवृत्त
www.24taas.com, वृत्तसंस्था, कोलंबो

श्रीलंकेचा सलामीचा फलंदाज तिलकरत्ने दिलशान याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची आज घोषणा केली आहे. येत्या सोमवारी ३७ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या दिलशानने, कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे सांगताना मर्यादीत षटकांचे सामने मात्र खेळणार असल्याचे जाहीर केलं आहे.

याबाबतची अधिकृत घोषणा दिलशान गुरूवारी पत्रकार परिषदेत करणार आहे. नोव्हेंबर ९९ मध्ये कसोटीत पदार्पण केलेल्या दिलशानने आतापर्यंत ८७ कसोटी सामने खेळले असून, ४०.९८ च्या सरासरीने ५४९२ धावा केल्या आहेत. १६ शतकं आणि २३ अर्धशतके त्याने झळकाविली आहेत.

यावर्षी मार्चमध्ये बांगलादेशविरुद्ध कोलंबो येथे खेळला गेलेला कसोटी सामना दिलशानचा अखेरचा कसोटी सामना ठरला आहे. जून २०११ मध्ये इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर त्याने साकारलेली १९३ धावांची खेळी संस्मरणीय आहे. आक्रमक फलंदाजीमुळे प्रसिद्ध असलेल्या दिलशानने नव्या पिढीच्या क्रिकेटपटूंना संधी मिळण्यासाठी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे, स्पष्ट केले आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, October 9, 2013, 17:43


comments powered by Disqus