Last Updated: Friday, November 16, 2012, 22:58
www.24taas.com, नवी दिल्ली `झी एन्टरटेन्मेंट एन्टरप्रायझेस`बरोबर २००७ साली केलेला पाच वर्षांचा करार मनमानी पद्धतीनं रद्द केल्याचा भारतीय क्रिकेट नियंत्रण बोर्डाला चांगलाच फटका बसलाय. तीन सदस्यीय एका मध्यस्थ न्यायाधिकरणानं बीसीसीआयला १२० करोड रुपयांचा दंड ठोठावलाय.
संबंधित करारानुसार `झी एन्टरटेन्मेंट एन्टरप्रायझेस`कडे परदेशात होणाऱ्या भारतीय क्रिकेट सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क होते. १२ एप्रिल २००६ रोजी बीसीसीआयबरोबर हा करार केला होता. या करारानुसार `झी`ला ३१ मार्च २०११ पर्यंत परदेशात खेळल्या जाणाऱ्या सर्व भारतीय सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क् होते. हा करार बेकायदेशीर पद्धतीनं रद्द करण्यात आल्यानं `झी` समूहाला झालेल्या तोट्याची भरपाई म्हणून ‘झी’नं ४८० कोटी रुपयांची मागणी केली होती. याच प्रकरणी न्यायाधिकरणानं बीसीसीआयला भरपाई म्हणून १२० रुपयांचा दंड भरण्याचा निर्णय दिलाय.
First Published: Friday, November 16, 2012, 22:57