पाकिस्तानचा बॅटसमन उमर अकमलला अटक Umar Akmal arrested for thrashing traffic warden

पाकिस्तानचा बॅटसमन उमर अकमलला अटक

पाकिस्तानचा बॅटसमन उमर अकमलला अटक

www.24taas.com, झी मीडिया, लाहौर

पाकिस्तानचा बॅटसमन उमर अकमलला अटक करण्यात आली आहे. लाहौरमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी अकमलला अटक करण्यात आली आहे.

आपल्या श्रीमुखात वाहतूक पोलिसाने भडकावल्याचा आरोप उमर अकमलने केला आहे. तेवीस वर्षांचा उमर अकमल म्हणतो की, पोलिसाचं वागणं योग्य नव्हतं, याची तक्रार द्यायला आपण पोलिस स्टेशनला गेलो, तर आपल्याला अटक करण्यात आली.

मात्र एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार उमर अकमलला पोलिसाने थांबवलं, कारण उमरने सिग्नल तोडला होता. मात्र त्याने पोलिसाला शिव्या दिल्या आणि शर्टही फाडला.

हे सर्व प्रकरण सीसीटीव्हीत कैद झालं आहे. चित्रफीत पाहिल्यावर सर्व प्रकार समोर येणार आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ

First Published: Sunday, February 2, 2014, 10:26


comments powered by Disqus