अंडर-१९ विश्वचषक : भारत X पाकिस्तान

अंडर-१९ विश्वचषक : भारताची पाकिस्तानवर मात

<B> <font color=red>अंडर-१९ विश्वचषक :</font></b> भारताची पाकिस्तानवर मात
www.24taas.com, झी मीडिया, दुबई

अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये भारतीय क्रिकेट टीमने विजयी सलामी दिली आहे. विशेष म्हणजे पहिल्याच लढतीत पारंपरिक पाकिस्तानला पराभूत करण्याची किमया भारतीय टीमने केली. भारतीय टीमने पाकिस्तानला ४० रन्सने पराभूत केल. टॉस जिंकून प्रथम बॅटिंगला उतरलेल्या भारतीय टीमने पाकिस्तानसमोर विजयासाठी २६३ रन्सचं आव्हान ठेवल होत. मात्र, पाकिस्तान टीम २२२ रन्सवर ऑल आऊट झाली. भारताकडून संजू सॅमसन आणि सरफराज खानने अनुक्रमे ६८ आणि ७४ रन्स केल्या. तर दीपक हूडाने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. मुंबईच्या सरफराज खानला 'प्लेअर ऑफ द मॅच'ने गौरवण्यात आल.

भारतातर्फे, अंकुश बायन्सनं २४ रन्स, अखिल हेरवाडकर ४१ रन्स, विजय झोल ३ रन्स, संजू सॅमसन ६८ रन्स, रिकी १ रन, कुलदीप यादव ५ रन्स, सरफराझ खान ७४ रन्स दिले. तर दीपक हुडा २२ रन्स आणि आमिर गनी ९ रन्सवर नाबाद राहिले.






इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, February 15, 2014, 17:04


comments powered by Disqus