दबावाखाली कमबॅकसाठी टीम इंडिया सज्ज!, Under-pressure India look to bounce back against England

दबावाखाली कमबॅकसाठी टीम इंडिया सज्ज!

दबावाखाली कमबॅकसाठी टीम इंडिया सज्ज!
www.24taas.com, कोलकाता

आज कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर भारतीय टीम टेस्ट सीरिजमध्ये कमबॅकसाठी प्रयत्नशील आहे. धोनीनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतलाय. आज हरभजनच्याऐवजी इशांत शर्माला संधी देण्यात आलीय.


मुंबई टेस्टटमध्ये इंग्लिश आर्मीकडून धोनी अॅन्ड कंपनीला सपाटून मार खावा लागला होता. त्यामुळे सीरिजमध्ये कमबॅकसाठी कोलकाता टेस्ट अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सीरिजमध्ये बॅकफटूवर असलेली टीम इंडिया पाहुण्यांना पराभवाचा धक्का देत सीरिजमध्ये आघाडी घेते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर आज भारत आणि इंग्लिश टीम पुन्हा आमने-सामने येणार आहे. मुंबई टेस्टमध्ये धोनी अॅन्ड कंपनीचं पानीपत झालं. त्यामुळे वानखेडेचा जिव्हारी लागलेला पराभवाचा वचपा घेण्यासाठी टीम इंडिया आतूर आहे. मुंबईत स्पिनर फ्रेंडली ट्रॅकवर तीन स्पिनर्ससह खेळण्याची चाल टीम इंडियावरच उलटी पडली होती. त्यामुळे हरभजन सिंगला तिसऱ्या टेस्टमध्ये डच्चू मिळण्याची शक्यता अधिक आहे. ईशांत शर्मा आणि अशोक दिंडा या दोघांपैकी एकाला ‘प्लेईंग इलेव्हन’मध्ये संधी मिळू शकते. सचिन तेंडुलकरच्या कामगिरीकडेही लक्ष असणार आहे. गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवागलाही चांगली ओपनिंग करून देण्याचं आव्हान असेल. विराट कोहलीच्याही बॅटमधून रन्सचा ओघ आटला आहे. तर युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनीलाही आपल्या बॅटिंगचा जलवा दाखवावा लागणार आहे. आर. अश्विन आणि प्रग्य़ान ओझाला इंग्लिश टीमच्या इनफॉर्म बॅट्समनना रोखण्याचं आव्हान असेल.

मॉन्टि पानेसर आणि ग्रॅमी स्वान ही इंग्लंडची स्पिन जोडी भारतासाठी धोकादायक ठरणार आहे. स्टिव्हन फिन हा इंग्लंडचा फास्ट बॉलर पुर्णपणे फिट आहे. स्टुअर्ट ब्रॉडऐवजी त्याला इंग्लंडच्या टीममध्ये स्थान मिळू शकते. तर केविन पीटरसनपासून भारताला सावध रहाव लागेल. कॅप्टन ऍलिस्टर कूकलाही भारताला रोखावं लागणार आहे. इंग्लिश टीम फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे टीम इंडियाला कोलकाता टेस्टमध्ये इंग्लिश टीमला परास्त करण्यासाठी चांगलेच कष्ट करावे लागणार एवढं नक्की...

First Published: Wednesday, December 5, 2012, 08:10


comments powered by Disqus