उर्वशी ठाकरेंचा मुंबई इंडियन्सला सपोर्ट, Urvashi Raj Thackeray Support to Mumbai Indians

उर्वशी ठाकरेंचा मुंबई इंडियन्सला सपोर्ट

उर्वशी ठाकरेंचा मुंबई इंडियन्सला सपोर्ट
www.24taas.com, मुंबई

आयपीएलमध्ये हॉट फेव्हरिट असणारी मुंबई इंडियन्सची सध्या भलतीच फॉर्मात आहे. आणि मुंबई इंडियन्सची मॅच मुंबईत असल्यावर तर अनेक मान्यवर आवर्जून उपस्थिती लावतात. आज मुंबई इंडियन्स आणि पुणे वॉरिअर्स यांच्यात सुरू असलेल्या मॅचला देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कन्या उर्वशी ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती.

क्रिकेट आणि मुंबई यांचे काही औरच नातं आहे. प्रत्येक मुंबईकर हा क्रिकेटप्रेमी असतोच.... त्यात आता आयपीएल सारख्या स्पर्धांनी तर एक वेगळीच मजा आणली आहे. आपल्या राज्याची टीमने आयपीएलमध्ये बाजी मारावी अशी प्रत्येकांची इच्छा असते. मग त्यात कोणीही मागे राहत नाही. जशा आयपीएलच्या मॅच रंगू लागतात. तशाच प्रत्येक मॅच पाहण्यासाठी प्रेषकांची गर्दीही वाढते.. त्यात व्हीआयपी देखील मागे नसतात. मग ते बॉलिवूडचे नट नट्या असोत वा राजकारणी... सगळेच मॅच पाहण्यासाठी बऱ्याचदा मैदानावर हजेरी लावतात.


उर्वशी ठाकरे यांनी मुंबई इंडियन्सच्या टीमची जर्सी परिधान केली होती. आणि मुंबईला सपोर्ट करण्यासाठी उर्वशी ठाकरे ह्या आपल्या मैत्रीणींसह वानखडे मैदानावर हजर होत्या. मुंबईने या मॅचमध्ये पुणे वॉरिअर्सची चांगलीच धूळधाण उडवली. उर्वशी ठाकरेंनी ही मॅच चांगलीच एन्जॉय केली.

First Published: Saturday, April 13, 2013, 19:17


comments powered by Disqus