उसैन बोल्ट- ख्रिस गेल कॅरेबाइन अजुबा!, USAIN BOLT AND CRISE GAYLE`S KARISMA

उसैन बोल्ट- ख्रिस गेल कॅरेबाइन अजुबा!

उसैन बोल्ट- ख्रिस गेल कॅरेबाइन अजुबा!

www.24taas.com, झी मीडिया मुंबई...

उसैन बोल्ट आणि ख्रिस गेल कॅरेबियन्सचे दोन अजुबे. खेळाच्या मैदानावर त्यांनी अविश्वसनिय कामगिरी केलीय. असाधारण अशा कामगिरीनं क्रीडा जगतावर त्यांनी आपली मोहिनी तर टाकलीच आहे. शिवाय आपल्या डान्स जलव्यानं त्यांनी क्रीडाप्रेमींवर जादू केलीय. विजयानंतरचं या दोघांचं अनोख सेलिब्रेशन क्रीडाप्रेमींसाठी एक स्पेशल ट्रीट ठरतं.
गेलची गगन्म स्टाईल
बोल्टचा अनोखा अंदाज
गेल-बोल्टचा डान्सिंग जलवा

ख्रिस गेल.... क्रिकेटच्या मैदानावरील एक अजब रसायन... टी-20 क्रिकेटचा बेताज बादशाह.... क्रिकेटच्या मैदानावर उतरला की, तो आपल्या बॅटिंगचा दाणपट्टा असा काही सुरु करतो की, ओव्हर्स संपल्यावरच त्याची बॅट शांत होते. पुण्याविरुद्ध त्यानं न भुतो न भविष्य अशी कामगिरी त्यानं केली. आपल्यामधील क्रिकेटिंग टॅलेंटनं त्यानं अवघ्या क्रिकेट जगताला वेड लावलंय. त्याचप्रमाणे त्याचं डान्सिंग टॅलेंटही लपून राहिलेलं नाही. विजयानंतर आणि विकेट घेतल्यानंतर त्याचा डान्सिंग जलवा नेहमीच पाहाय़ला मिळतो. त्याचा गगन्म स्टाईल डान्स तर क्रिकेटविश्वात चांगलाच पॉप्युलर आहे.

टी-20 वर्ल्ड कप विजयानंतर त्यानं केलेली डान्सिंग मस्ती क्रिकेटप्रेमी अजूनही विसरलेले नाहीत. गेलचा बिनधास्त अंदाज सर्वश्रुत आहे. डान्सची त्याला आवड आहे. आणि कोणत्याही गाण्यावर थिरकायल तो विसरत नाही. वेळ कुठलीही असो, जागा कोणतीही असो.. कारण असो वा नसो.. गेल मात्र कुठल्याही गाण्यावर थिरकायला विसरत नाही... फक्त म्य़ुझिक वाजलं पाहिजे... मग पाहा गेलची धमाल.. गेलनं तर विराट कोहली आणि लंकेचा लिजेंडरी स्पिनर मुथय्या मुरलीधरनला आपल्याबरोबर ताल धरायला भाग पाडलं होतं..

तर दुसरीकडे उसैन बोल्टही आपल्या अनोख्या डान्सिंग स्टाईलसाठी क्रीडा विश्वात ओळखला जातो. कुठलीही रेस जिंकल्यानंतर त्याचा विजयी जल्लोष हा क्रीडाप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरतो. त्याची विजयी मुद्रा टिपण्साठी जगभरातील कॅमेरे त्याच्यावर रोखलेले असतात. बोल्ट आणि गेल ही कॅरेबियन्सचे डान्सिंग ऍम्बेसिडर्स आहेत असं म्हटलं तर काही वावग ठरणार नाही. दोघांचाही सेलिब्रेशन अंदाज हा क्रीडाप्रेंमीसाठी नेहमीच उत्सुकतेचा विषय ठरतो.

First Published: Thursday, April 25, 2013, 20:18


comments powered by Disqus