विनोद कांबळीला `लिलावती`तून डिस्चार्ज!, vinod kambli gets discharge from lilavati

विनोद कांबळीला `लिलावती`तून डिस्चार्ज!

विनोद कांबळीला `लिलावती`तून डिस्चार्ज!

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

माजी भारतीय क्रिकेटर विनोद कांबळीला मंगळवारी ‘लिलावती’तून डिस्चार्ज देण्यात आलाय.

हृदयाचा धक्का बसल्यानं विनोद कांबळीला मुंबईतल्या लिलावती हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. हॉस्पीटलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद कांबळीला हॉस्पीटलमधून सुट्टी देण्यात आलीय.

पोलिसांनी ४१ वर्षीय विनोदला २९ नोव्हेंबर रोजी हॉस्पीटलमध्ये दाखल केलं होतं. कार चालवत असतानाच विनोदच्या छातीत दुखू लागलं होतं. त्यामुळे गाडी बाजूला घेत त्यानं जवळच असलेल्या पोलिसांकडे मदत मागितली होती.

‘तुमच्या सगळ्यांनी माझ्यासाठी केलेल्या प्रार्थनेसाठी धन्यवाद. माझी प्रकृती आता पहिल्यापेक्षा उत्तम आहे. मी घरी परततोय’ असं हॉस्पीटलमधून निघालेल्या विनोदनं म्हटलंय.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, December 4, 2013, 13:55


comments powered by Disqus