विनोद कांबळीनं केलं पुन्हा एकदा लग्न, vinod kambli opts for catholic wedding

विनोद कांबळीनं केलं पुन्हा एकदा लग्न

विनोद कांबळीनं केलं पुन्हा एकदा लग्न

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

माजी क्रिकेटर विनोद कांबळी यानं पुन्हा एकदा विवाह केलाय. आता त्याची पत्नी कोण? असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल... तर थांबा! कारण, त्यानं त्याच्याच पत्नीशी म्हणजे अभिनेत्री एन्ड्रिया हेवित हिच्यासोबत पुन्हा एकदा विवाह केलाय.

शनिवारी वांद्र्याच्या सेंट पीटर्स चर्चमध्ये परंपरागत ख्रिश्चन पद्धतीनं विनोदनं पत्नी एन्ड्रिया हिच्यासोबत विवाह केला. विनोद आणि एन्ड्रियानं काही वर्षांपूर्वी कोर्ट मॅरेज केलं होतं. परंतु, आता मात्र त्यांनी सगळ्या रीती-परंपरेप्रामाणे लग्न केलंय. या खास सोहळ्याच्या वेळी त्यांचा मुलगा जीजस क्रिस्टियानो हादेखील उपस्थित होता.

या लग्नाचा कार्यक्रम एका आठवड्यापूर्वीच ठरल्यानं त्यांना अनेकांना निमंत्रण पाठवायला वेळच मिळाला नाही. त्यामुळे, विनोद-एन्ड्रिया यांचे काही जवळचे मित्रच या लग्नासाठी उपस्थित होते. या लग्नासाठी अभिनेता आशुतोष राणा आणि त्याची पत्नी रेणुका शहाणे हेदेखील उपस्थित होते.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, May 5, 2014, 17:02


comments powered by Disqus