सेहवाग चॅम्पियन लीग टी-२०ला मुकणार, Virender Sehwag out for 2 weeks with ankle injury, may miss CLT20

सेहवाग चॅम्पियन लीग टी-२०ला मुकणार

सेहवाग चॅम्पियन लीग टी-२०ला मुकणार
www.24taas.com,कोलंबो

टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग हा चॅम्पियन लीग ट्‌वेंटी-२० स्पर्धेत खेळण्याची कमी शक्यता आहे. त्याच्या पायाला दुखापत झाल्यामुळे डॉक्टरांनी त्याला पुढील दोन आठवडे विश्रांतीचा सल्ला दिला आहे. यामुळे चॅम्पियन लीग ट्‌वेंटी-२०मध्ये तो खेळण्याची शक्य‌ता कमीच आहे.

कोलंबो येथे विश्वमकरंडक ट्‌वेंटी-२० क्रिकेट सामन्यादरम्यान मंगळवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना सेहवागच्या पायाला दुखापत झाली होती. ही दुखापत बऱ्यापैकी असल्याने १४ दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे, अशी माहिती संघाचे प्रसिद्धी व्यवस्थापक डॉ. आर. एन. बाबा यांनी आज बुधवार दिली.

चॅम्पियन लीग टी-२० स्पर्धा ९ ऑक्टोॉबरपासून सुरू होत आहेत. मात्र, सेहवाग चॅम्पियन लीग सामन्यांदरम्यान तो खेळण्याची शक्यीता कमी आहे, अशी सूत्रांकडून माहिती देण्यात आली आहे. कोलंबो येथे टी-२० विश्व करंडक क्रिकेट स्पर्धेत तीन सामन्यात सेहवागने केवळ ५४ रन्स केल्या.

First Published: Wednesday, October 3, 2012, 14:39


comments powered by Disqus