सचिन, सेहवागला टाकले मागे, केले २८७ रन्सVivek yadav done 287 runs, Form a new Record in One Day Matc

सचिन, सेहवागला टाकले मागे, केले २८७ रन्स!

सचिन, सेहवागला टाकले मागे, केले २८७ रन्स!
www.24taas.com, वृत्तसंस्था, जयपूर

राजस्थानच्या विवेक यादवनं एक नवा विक्रम केलाय. त्यानं वन डे मॅचमध्ये २८७ रन्सचा डोंगर उभारलाय. एवढंच नाही तर विवेकनं चार ओव्हरमध्ये फक्त १ रन देत ७ विकेट घेतल्या. विवेकच्या या विक्रमानं त्यानं सचिन, सेहवागलाही मागे टाकलंय.

राजस्थानला रणजी चॅम्पियन बनवण्यात ज्यानं मोलाचा वाटा उचलला त्या विवेक यादवनं आणखी एक विक्रम केला. जयपूरमध्ये आयोजित माजी क्रिकेटपटू समशेर सिंग स्मृतिचषक क्रिकेट स्पर्धेत अरवली क्लब आणि लखनौमधला सेंट अँजेल क्लब यांच्यामध्ये झालेल्या लढतीत विवेकनं हा विक्रम केला. त्यानं १४६ बॉल्समध्ये ४९ दमदार चौकार आणि ५ गगनभेदी षटकार मारत २८७ रन्स केले.

जयपूर क्रिकेट असोसिएशननं आयोजित केलेल्या या मॅचमध्ये अरवली क्लबतर्फे खेळतांना विवेक यादवनं ही दमदार खेळी केली. त्याच्या धडाकेबाज बॅटिंगच्या जोरावर अरवली क्लबनं ५१२ धावांचा डोंगर उभारला.

यापूर्वी ‘लिस्ट ए क्रिकेट’मध्ये एका डावात सर्वाधिक रन्स करण्याचा विक्रम इंग्लंडच्या अली ब्राऊनच्या नावावर होता. त्यानं सरे कौंटी क्लबचं प्रतिनिधित्व करताना २६८ रन्स केले होते. तर वन डे क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक रन्स करण्याचा मान श्रीलंकेनं मिळवला. त्यांनी ४४३ रन्स करत नंबर वन स्थान पटकावलं.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, October 9, 2013, 12:45


comments powered by Disqus